Stock Market : सेन्सेक्स सूसाट, गुंतवणूकदारांना छप्परफाड कमाई

Stock Market : सेन्सेक्स सूसाट, गुंतवणूकदारांना छप्परफाड कमाई
Stock Market : स्टॉक मार्केटने गुंतवणूकदारांना निराशेतून बाहेर आणले. गेल्या सात दिवसांपासून अनेक शेअरने जोरदार कामगिरी बजावली. सेन्सेक्सने आठवड्यात कमाल केली. त्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा फायदा झाला. नवी दिल्ली : भारतीय शेअर बाजार (Share market) सलग सातव्या दिवशी तेजी दिसून आली. आजही सेन्सेक्स आणि निफ्टी (Sensex-Nifty) तेजीसह बंद झाले. सलग सातव्या व्यापारी सत्रात तेजीचा हंगाम सुरुच होता. मंगळवारी सेन्सेक्समध्ये 311 अंकांची तेजी दिसून आली. या तेजीनंतर सेन्सेक्सने 60,000 अंकांचा टप्पा ओलांडला. तज्ज्ञांच्या मते, जागतिक बाजारातील तेजी आणि परदेशातील गुंतवणुकीचा ओघ सुरु असल्याने हा गुंतवणूकदारांचा फायदा झाला. मेटल, बँकिंग आणि आर्थिक क्षेत्रातील शेअर्समध्ये खरेदी वाढली. त्यामुळे बाजाराला मदत झाली. गुंतणूकदारांना कमाईची मोठी संधी मिळाली. सेन्सेक्स-निफ्टी तेजीत 30 शेअर्सचा सेन्सेक्स 311.21 अंकांनी म्हणजे 0.52 टक्क्यांनी वधारला. आज सेन्सेक 60,157.72 अंकावर बंद झाला. व्यापारी सत्राच्या काळात सेन्सेक्स 421.17 अंकांनी वधारला. सेन्सेक्समध्ये वाढीचा हा सातवा दिवस आहे. या काळात सेन्सेक्स एकूण 2,544 अंकांनी म्हणजे 4.41 टक्क्यांनी वधारला. बीएसई प्रमाणेच नॅशनल स्टॉक एक्सचेंजने पण निफ्टीत मंगळवारी 98.25 अंकांची म्हणजे 0.56 टक्क्यांची तेजी दिसून आली. एनएसई 17,722.30 अंकावर बंद झाला. या कंपन्यांची कमाल सेन्सेक्समध्ये कोटक महिंद्रा, टाटा स्टील, आयटीसी, आयसीआयसीआय बँक, बजाज फिनसर्व्ह, मारुती सुझुकी, माहिंद्रा ॲंड महिंद्रा आणि भारतीय स्टेट बँक प्रामुख्याने फायद्यात राहिल्या. त्यांना मोठा फायदा झाला विक्रीचे सत्र जोरात तर दुसरीकडे टाटा कन्सटलन्सी सर्व्हिसेज, इन्फोसिस, एचसीएल टेक्नॉलॉजीज, टेक महिंद्रा, एशियन पेंट्स, विप्रो आणि टाटा मोटर्सच्या शेअर्सचे मोठे नुकसान झाले. या शेअरमध्ये जोरदार विक्री झाली. जागतिक बाजाराची स्थिती काय बीएसई स्मॉलकॅप 0.62 टक्क्यांनी वधारला. तर मिडकॅप 0.40 टक्क्यांनी वाढला. याशिवाय आशियातील इतर बाजारांमध्ये दक्षिण कोरियाची कॉस्पी, जापानची निक्की आणि हाँगकाँगचा हँगसँग हा बाजार फायदात राहिला. तर शांघाई कम्पोझिटला फार मोठे नुकसान झाले. युरोपातील प्रमुख बाजारात दुपारी तेजी दिसून आली. अमेरिकेतील बाजारा सोमवारी तेजीसह बंद झाले. तिमाही निकालांची प्रतिक्षा तज्ज्ञांच्या मते, गुंतवणूकदार आता कंपन्यांचे मार्च महिन्यातील निकालाची प्रतिक्षा करत आहेत. या हप्त्यात कंपन्यांच्या चौथ्या तिमाही निकालाची प्रतिक्षा आहे. हे निकाल या आठवड्यात येण्यास सुरुवात होईल. याशिवाय महागाई आणि औद्योगिक उत्पादनाशी संबंधित आकडे पण या आठवड्यात समोर येतील. शेअर बाजारातील आकड्यानुसार, परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी सोमवारी 882.52 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केल्याचे दिसून आले.

Popular Posts